पणजी – गोव्यातील जनतेने गोल्डन भविष्यासाठी भाजपलाच निवडण्याचं ठरवलं आहे. प्रमोद सावंत यांच्या युवा नेतृत्त्वाखाली भाजप यश मिळवेल. असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात केलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा गोव्यात कमळ फुलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होईल. सर्व उमेदवारांना शुभेच्छा, असंही मोदी म्हणाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील म्हापसा येथे सभा झाली. या सभेत ते बोलत हबोते.
या भाषणात त्यांनी गोव्यातील दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचीही आठवण काढली. ‘जेव्हा पण मी गोव्यात येतो तर माझे मित्र मनोहर पर्रिकर यांची उणीव नेहमी भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमी खूप जास्त प्रमाणात जाणवत असेल. मी भाजपाचे वरिष्ठ नेते दिवंगत फ्रान्सिस डिसुझा ज्यांच्यसोबत काम करण्याची देखील मला संधी मिळाली, यांच देखील स्मरण करतो, असं मोदी म्हणाले.
याचबरोबर, ”माझ्या आयुष्याच्या महत्वपूर्ण क्षणात गोव्याच्या भूमीला एवढं निर्णायक बनवलं, तुम्ही आज मला ज्या रूपात पाहात आहात, जिथे मला पाहात आहात त्याची सुरूवात गोव्यातूनच झाली होती.” असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.