संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

गोव्यात भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यात आश्वासनांची खैरात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी- गोव्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. याच रणधुमाळीत आज भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात जेष्ठांना 3 हजारांची पेन्शन, तरुणाना रोजगार गोव्याला ट्यूरिझम हब बनवणार आदी अनेक आश्वासनांची जाहीरनाम्यात खैरात केली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आदी नेते हजर होते या जाहीरनाम्यात भाजपने गोव्याला जल प्रदूषण वायू प्रदूषण मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच या जाहीरनाम्यात गोवेकरांसाठी 22 संकल्प करण्यात आले आहेत. ज्यात जेष्ठ नागरिकांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन, बेरोजगार तरुणांना रोजगार भत्त्या ऐवजी रोजगार देण्यावर भर दिला जाणार आहे.

तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या ईपी एफ खात्यात पाच हजार टाकण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच महिलांना घर खरेदीसाठी 2 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल. गोव्यात पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करून त्यातून रोजगार निर्मितीचे आश्वासन देण्यात आलेय. तसेच गोव्यात क्लीन ट्रान्सपोरेशन साठी इलेक्ट्रीवर चालणार्या लक्झरी बसेस चालवल्या जातील त्यासाठी चार्जिंग स्टेशन तयार केले जातील याबाबतची माहिती देताना गडकरी यांनी सांगितले कि . ग्रीन हायड्रोजन वर चालणारी गाडी दिल्लीत आहे. पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा करून हायट्रोजनवर चालणारी हि गाडी आहे. फारीदाबाद्च्या इंडियन ओईल मध्ये त्याचे ग्रीन हायट्रोजन तयार होणार आहे त्यानंतर दिल्लीच्या रस्त्यावर पायलट प्रोजेक्ट म्हणून हि गाडी धावणार आहे. ग्रीन हायट्रोजन हेच आता भविष्य असेल असे गडकरी यांनी सांगितले .ते पुढे म्हणाले मनोहर पर्रीकर यांनी गोव्याला व्हिजन दिले. आयटी इंडस्ट्रीज आणि पर्यटनाला चालना दिली. तेच धोरण प्रमोद सावंत पुढे नेत आहेत काही अज्ञानी लोक सांगतात कि आम्ही मोहल्ला स्वच्ह करू पण भारतात सर्वात चांगली हेल्थ सर्विस गोव्यात आहे असेही यावेळी गडकरी यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami