संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

गौतम अदानी ग्रुप आता पेट्रोलियम उद्योगामध्ये उतरण्याच्या तयारीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गुजरातमध्ये ३२ हजार कोटी खर्च करणार

नवी दिल्ली- भारतातील दाेन सर्वात श्रीमंत उद्याेजक अदानी समुहाचे अध्यक्ष गाैतम अदानी आणि रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यातील व्यवसायात कायम स्पर्धा सूर असते.पण दोघेही वरवर तसे आमच्यात कशी नसल्याचे सांगतात.कारण गौतम अदानी यांनी आता आधीपासूनच पेट्रोलियम व्यवसायात असलेल्या मुकेश अंबानीना उघडपणे टक्कर देण्याचे ठरवले आहे. अदानी हे आपल्या गुजरात राज्यात पेट्रोलियम व्यवसायासाठी तब्बल ३२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहेत.
भारतात आत्तापर्यंत पेट्रोलियम व्यवसायात मुकेश अंबानी यांचाच वरचष्मा दिसून आला आहे.पण आता गौतम अदानी यांनीही या व्यवसायात उतरण्याची योजना आखली आहे. अदानी हे आपल्या एअर पोर्टच्या प्रवाशांना आपल्या इतर योजनांकडे आकर्षित करून घेण्यासाठी सुपर अँप तयार करणार आहेत.अदानी यांनी पेट्रोलियम व्यवसायात पाऊल ठेवताना या व्यवसायात कुणाशीही स्पर्धा नसल्याचे म्हटले आहे.भारत ही विकासाची मोठी बाजारपेठ असून याठिकाणी सर्वांचेच स्वागत केले जाते.
अशी प्रतिक्रिया गौतम अदानी यांनी फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीवेळी दिली आहे. दरम्यान,आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था २०५० पर्यंत ३० ट्रिलीयन इतकी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सामाजिक आणि आर्थिक सुधारणांमुळे हे शक्य होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami