गौतम गंभीरला आलेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातूनच! दिल्ली पोलिसांचा खुलासा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नवी दिल्ली – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार गौतम गंभीरला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हाधमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आला होता. दरम्यान, गौतम गंभीरने आरोप केला होता की, त्याला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण ज्या सिस्टीमद्वारे हा ई-मेल पाठवला गेला आहे, त्याचा आयपी ऍड्रेस पाकिस्तानमधील असल्याचे आढळून आले आहे.

दिल्ली पोलिसांनी याबाबत गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी ऍड्रेसही सापडला आहे. विशेष म्हणजे फक्त गौतम गंभीरच नाही तर इतरही अनेकांना दहशतवादी संघटना इसिसच्या नावाने धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त इतर अनेक यंत्रणा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. दरंयान, गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप गंभीरने केला होता. याबाबत डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले होते की, गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर याआधीही दोन वर्षापूर्वी गौतम गंभीरने परदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगत पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावेळी खासदार गौतम गंभीरने शहादारा जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक यांना पत्र लिहिले होते. यात गौतम गंभीरने ‘मला आणि माझ्या परिवाराला परेदशी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबबात मी तक्रार नोंदवली आहे. तरी माझी सुरक्षा वाढवण्यात यावी’, अशी मागणी केली होती.

Close Bitnami banner
Bitnami