संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

गौतम नवलखांना घरात नजरकैदेत ठेवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांची वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थामुळे तुरुंगात ऐवजी त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात यावे ही विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. त्यानुसार आता नवलखा यांना तुरुंगात ऐवजी त्यांच्या घरी नजरकैदेत राहणार आहेत.

नवलखा यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती की, मला महाराष्ट्रातील तळोजा कारागृहातील न्यायालयीन कोठडीऐवजी स्वतःच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात यावे. यावर आज सुनावणीवेळी कोर्टाने त्यांची ही विनंती मान्य केली. तसेच महाराष्ट्र सरकारला या प्रक्रियेसाठी आवश्यक तयारीचा आढावा घेण्यास सांगितले. हा आढावा पूर्ण झाल्यानंतर पुढील 48 तासांत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे, असे आदेशही कोर्टाने सरकारला दिले. ही परवानगी देताना कोर्टाने काही अटीशर्तींही घातल्या आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, नवलखा यांना कुठलाही मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच कोणतेही संवादाचे साधन वापरता येणार नाही. त्यांना केवळ ड्युटीवर असलेल्या पोलिसांकडूनच दिलेल्या फोनचा वापर करता येईल, तोही पोलिसांच्या उपस्थितीत दिवसातून एकदा केवळ मिनिटांसाठी. त्याचबरोबर शस्त्रधारी पोलिसांनी या नजरकैदेचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami