मुंबई – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पूर्व उपनगरामध्ये भांडुप (पश्चिम) एस विभागातील क्वारी रोड या ठिकाणी १२०० मिलीमीटर व ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.या दुरुस्ती कामांमुळे २ मार्च रोजी रात्री १२ पासून ते ३ मार्च रात्री १२ या कालावधीत म्हणजे २४ तासांसाठी घाटकोपर व भांडूप परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी त्याआधी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे,अशी विनंती पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.