संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वनच्या एअरपोर्ट रोड स्थानकात बुधवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मेट्रो विस्कळीत झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. यामुळे मेट्रो विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची गर्दी वाढली होती. वर्सोवा-घाटकोपर मेट्रो वनमधील एअरपोर्ट रोड स्थानकात रात्री ९.१५ च्या सुमारास मेट्रोत तांत्रिक बिघाड झाला. स्थानकात उभ्या असलेल्या मेट्रोचे दरवाजे बंद होत नव्हते. त्यामुळे ती स्थानकातच अडकून पडली. परिणामी मेट्रो विस्कळीत होऊन ऐन पावसाळ्यात प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर मेट्रो सुरू झाली. मात्र ती विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami