संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

चंदिगडमध्ये ३६ तासांपासून ‘ब्लॅक आऊट’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदिगड – खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी ३ दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे चंदिगडची वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे. सोमवारी सायंकाळपासून हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरातील अनेक सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विजेअभावी सरकारी रुग्णालयांमधील अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या आहेत.

वीज विभागाच्या खासगीकरणाला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी संपाची हाक दिली. केंद्रशासित प्रदेशाचे सल्लागार धर्मपाल यांनी वीज कर्मचारी संघटनांबरोबर चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहराच्या अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायाबरोबरच रुग्णालयांवरही झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने सरकारी रुग्णालयांमधील महत्त्वाच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या आहेत. जनरेटरवर रुग्णालयाचा सर्व भार टाकता येत नाही. त्यामुळे त्या लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत, अशी माहिती चंदिगडचे आरोग्य संचालक डॉ. सुमन सिंह यांनी दिली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ऑनलाईन कोचिंग आणि शिक्षणही बंद पडले आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या या संपावर तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami