संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

चंदीगडच्या होस्टेलमधील व्हिडिओ प्रकरणात एका विद्यार्थिनीला अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मोहाली- चंदीगड विद्यापीठाच्या मोहालीतील होस्टेलच्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात पंजाब पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीला अटक केली आहे. तिने हा व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. होस्टेलमधील ८ विद्यार्थिनींनी या घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त खोटे असल्याचा खुलासा पोलिसांनी केला. पंजाबचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री गुरमीत सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
चंदीगड विद्यापीठाच्या मोहालीतील होस्टेलमध्ये ६० विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे वृत्त पसरले. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री होस्टेल व परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाला घेराव घालून कारवाईची मागणी केली. संताप विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले. त्यानंतर होस्टेलमधील ८ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त पसरले. या प्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. होस्टेलमधील एका मुलीने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचे उघडकीस आले आहे. तो ६० मुलींचा नाही, असेही पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचा कोणीही प्रयत्न केलेला नाही. वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल केलेल्या एका मुलीला अटक केली आहे. तिचा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ताब्यात घेतली आहेत. ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत. तिने एकाच मुलीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या घटनेमुळे पंजाबचे शिक्षण क्षेत्र हादरले. उच्च शिक्षण मंत्र्यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami