पुणे- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुण्याचे पालकमंत्री आणि चंद्रकात पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करणारे आरोपी मनोज गरबडेसह तीन जणांना पुण्याच्या सत्र न्यायालयाकडून आज जामीन मंजूर झाला. ते बाहेर येताच त्यांच्यावर फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले . तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंडवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती.
चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणानंतर प्रमुख आरोपी मनोज गरबडे याच्यासह तिघांवर विविध गुन्हे चिंचवड पोलिसांनी दाखल केले होते. यामध्ये सदोष मनुष्यवधाचं कलम ३०७ ही आरोपी मनोजवर लावण्यात आलं होतं. विनापरवाना आंदोलन केल्याचं कलमही त्याच्यावर लावण्यात आलं होतं. यांपैकी कलम ३०७ लावण्यावरुन बराच गदारोळ झाल्यानं काल पोलिसांनी हे कलम मागे घेतलं होतं. ९ डिसेंबर रोजी पैठण इथं संत विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाईफेक करण्यत आली होती. या शाईफेक प्रकरणात निलंबित केलेल्या पोलिसांचे निलंबनही मागे घेण्यात आले आहे .