मुंबई – पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शाईफेक प्रकरणानंतर आता चांगलेच सावध झालेले दिसत आहेत.कारण चंद्रकांत पाटलांनी पुन्हा शाईफेकीची धमकी आल्याने पुण्यातीलच एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना ‘ फेस मास्क ‘ चा वापर केल्याचे दिसून आले.
पुण्यातील सांगवी येथील पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला मंत्री चंद्रकांत पाटील हे ‘ फेस मास्क ” लावून हजर झाले होते. काल शनिवारी त्यांना सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाटील यांनी फेस शिल्डचा वापर केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान,या कार्यक्रमापूर्वी चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर शाईफेकीची धमकी आली होती.फेसबुकवर पोस्ट करत विकास लोले व दशरथ पाटील नावाच्या दोघांनी व्ही धमकी दिली होती.त्यांच्यावर भाजप माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या तक्रारीवरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याने शाईफेकीची शक्यता होती. यामुळे चंद्रकांत पाटलांनी खबरदारी म्हणून फेस शिल्ड लावत उद्घाटन केले.