चंद्रकांत बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज वैध! आक्षेपांमुळे ९ तास चालली सुनावणी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नागपूर – विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखल केलेल्या अर्जावर कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी अनेक आक्षेप घेतले होते. यावेळी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी सखोल पडताळणी केली व त्यानंतर आक्षेप फेटाळत बावनकुळे यांचा अर्ज वैध असल्याचा निर्वाळा दिला. मात्र अनेक आक्षेपांमुळे ही सुनावणी तब्बल ९ तास चालली होती.

रवींद्र भोयर यांनी बुधवारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शपथपत्रातील विविध बाबींवर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. बावनकुळे हे कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थान संस्थानचे पदाधिकारी आहेत. या संस्थानाला शासनाकडून अडीचशे कोटींचा निधी प्राप्त झाला असून हे देवस्थान ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’मध्ये येते. मूळ शपथपत्रात बावनकुळे यांनी याबाबत उल्लेख केला नव्हता. नवीन शपथपत्र स्वीकारण्यात येऊ नये, अशी भूमिका भोयर यांनी घेतली आहे. तसेच बावनकुळे यांच्या कुटुंबीयांची पदे आणि संपत्तीच्या तपशिलावरदेखील त्यांनी आक्षेप घेतला.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सर्व आक्षेप ऐकून घेतले. यात काही ठिकाणी त्यांना निर्णय घेताना अडचणी वाटल्या पण वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन घेऊन त्यांनी अखेर बावनकुळे यांचा अर्ज वैध ठरवला. मात्र या सुनावणीसाठी सकाळी ११ ते रात्री ८.१५ असे ९ तास लागले. दरम्यान, बावनकुळे यांच्या शपथपत्राची सत्यप्रत देण्यात यावी, अशी मागणी भोयर यांनी परत अर्ज करून केली आहे. तसेच त्यांनी एकाही उमेदवाराने कार्यालयाबाहेर आपले शपथपत्र लावले नसल्याने निवडणूक विभागाकडूनच नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप केला आहे. बावनकुळे यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र भोयर, प्रफुल्ल गडदे आणि अपक्ष सुरेश रेवतकर व मंगेश देशमुख असे पाचही जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता यातील किती उमेदवार अर्ज परत घेतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Close Bitnami banner
Bitnami