चंद्रपूर – वाघाच्या हल्ल्यात भोजराज मेश्राम या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. त्यानंतर कामगारांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर महाऔष्णिक वीज केंद्रातील तीन वाघ जेरबंद करण्याचे आदेश चंद्रपूर वनविभागाला मिळाले आहेत.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी हे आदेश निर्गमित केलेत. सीटीपीएस वन ही वाघीण आणि तिच्या अंदाजे दोन वर्षे वयाच्या दोन पिल्लांना जेरबंद करण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर आहे. वाघ केंद्राच्या आवारात भटकताना काही जणांना दिसला. या वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी होत असतानाच तत्पूर्वी वाघाने डाव साधला. त्यामुळे या वाघांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच सोळा फेब्रुवारीला रात्री पावणेअकरा वाजता वाघाने कामगाराला उचलून नेले. काम पूर्ण करून सायकलने ते घरी परत येत होते. भोजराज मेश्राम असे या कामगाराचे नाव आहे. भोजराज यांना वाघाने उचलून नेल्यानंतर त्यांचे शीर धडावेगळे केले होते. सायकल तिथेच पडून होती. याची माहिती वीज केंद्राच्या व्यवस्थापनाला आणि वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने शोधमोहीम राबविल्यानंतर भोजराज यांचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावर सापडला.यांनतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी हे आदेश निर्गमित केले असल्याचे समजते.