संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

चंद्रपूर वीज केंद्रातील एक वाघ जेरबंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंद्रपूर- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात दहशत माजविणार्‍या एका वाघाला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे या वाघाला काल रात्री उशिरा बेशुद्ध करून पकडण्यात आले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचे राजरोसपणे दर्शन होत होते. वाघाच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्य झाला तर या परिसराला लागूनच असलेल्या दुर्गापूर येथे दुसर्‍या दिवशी बिबट्याने 16 वर्षीय मुलाला उचलून नेले होते.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. या परिसरातील वाघांना जेरबंद करण्यासाठी राजकीय दबाव वाढू लागला होता.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील घटनास्थळाची पाहणी करून वाघांना जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. तर काल सोमवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत बैठक घेऊन सूचना केल्या.तीन वाघांना पकडण्याचे निर्देश वनविभागाला प्राप्त झाले होते.त्यानुसार वनविभाग आणि वीज केंद्राचे संयुक्त पथक तयार करून गस्त घालण्याचे काम सुरू होते. यादरम्यान काल रात्री पर्यावरण चौकापासून काही अंतरावर हा वाघ दिसून आला. वनविभागाचे अजय मराठे यांनी या वाघाला डार्ट मारून बेशुद्ध केले, तर पशुवैद्यकीय अधिकारी खोब्रागडे यांनी वाघाची तपासणी केली. या वाघाला आता ट्रांजीट केंद्रात दाखल करण्यात आले. वाघाला पकडले गेल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या परिसरात आणखी दोन वाघ आहेत त्यांना वनविभाग कधी पकडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami