संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

चंद्रशेखर राव याना चंद्राबाबूंचा विरोध! दक्षिणेत विरोधकांमध्ये मोठी फूट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैद्राबाद – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम सुरु आहे. पण त्याचवेळी दक्षिणेत मात्र विरोधकांमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे . सध्या राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होण्याच्या प्रयत्नात असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री टी चंद्रशेखर राव यांच्या विरोधात तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि आघाडी उघडली आहे.

आंध्र प्रदेश हे एकसंघ राज्य असताना तेलंगणाच्या मागणीसाठी टी चंद्रशेखर राव यांनी मोठे आंदोलन छेडले होते तसेच दीर्घ उपोषण केले होते. यावेळी तेलगू देसम आणि टीआरएस या दोन्ही पक्षांच्या र्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी राडेबाजी झाली होती . आणि तेंव्हापासून आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि टी चंद्रशेखर राव यांच्यात टोकाचे मतभेद आहेत . सध्या विरोधी पक्षांमध्ये चंद्राबाबू नायडू याना मोठे स्थान आहे .पण गेल्या वर्षभरापासून टी चंद्रशेखर राव यांनी विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत . त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांमध्ये त्यांच्या विषयी एक विश्वासाची भावना निर्माण झाली आहे . त्यामुळे चंद्रशेखर राव आपली जागा घेतील अशी भीती चंद्राबाबूंना वाटू लागली आहे. त्यामुळे चंद्राबाबूंनी चंद्रशेखर राव याना उघडपणे विरोध करायला सुरुवात केली आहे. परिणामी दक्षिणेत विरोधकांमध्ये फूट पडलेली बघायला मिळत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami