न्यूयार्क – नासाचे ओरियन अंतराळयान चंद्राभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून 26 दिवसांनी पृथ्वीवर परतले. नासाच्या आर्टेमिस-1 मोहिमेदरम्यान ओरियन रॉकेट चंद्रावर पाठवण्यात आले होते. नासाचे मिशन मून हे अमेरिकेचे मोठे पाऊल मानले जात आहे.
ओरियन कॅप्सूलने पृथ्वीच्या वातावरणात मध्यरात्री प्रवेश केला. मोठ्या आवाजासह ओरियन पृथ्वीच्या वातावरणात शिरले आणि प्रशांत महासागरात कोसळले. कोसळताना वेग कमी करण्यासाठी ओरियनने पॅराशूटचा वापर करण्यात आला. आर्टेमिस आय असे नासाच्या या चंद्रयान मोहिमेचे नाव आहे. आर्टेमिस आय हे नासाची चाचणी मोहीम आहे. आर्टेमिस आयमधून ओरियन कॅप्सूलद्वारे पुतळे पाठवण्यात आले होते. या पुतळ्यांच्या आधारे मानवासाठीचं निरिक्षण आणि संशोधन केलं जाईल. ओरियन फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून 16 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांनी ट्वीट करत नासाचं कौतुक केलं आहे.1972 मध्ये याचे दिवशी जीन सेर्नन आणि हॅरिसन श्मिट याचे अंतराळान अपोलो 17 चंद्रावर उतरलं होते. 11 डिसेंबर रोजी या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.