संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

चंद्रावरून आणलेल्या मातीत रोपटी उगवल्याने नासाचे शास्त्रज्ञ चकित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

वॉशिंग्टन- चंद्रावर जीवसृष्टी हा विज्ञानासाठी नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे. चंद्रावर जीवसृष्टी शक्य आहे का? यावर जगातील सर्वच देशांचे शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. असे असताना एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. नासाच्या अमेरिकन अंतराळवीरांनी चंद्रावरून आणलेल्या मातीत लावलेली रोपे उगवली आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे. या घटनेने शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.

नासाच्या अपोलो अंतराळवीरांनी अलीकडेच चंद्र मोहीम केली होती. त्यावेळी त्यांनी येताना सोबत चंद्रावरील माती आणि धूळ आणली होती. त्यात त्यांनी वनस्पतीच्या काही बिया टाकल्या. विशेष म्हणजे या सर्व बियांना अंकुर फुटले. या घटनेमुळे चंद्रावरील जीवसृष्टीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना नवी सकारात्मक दिशा मिळाली आहे, असे फ्लोरिडा विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ फूड अँड अग्रिकल्चर सायन्सचे रॉबर्ट फेरेल यांनी सांगितले. अपोलो ११ च्या अंतराळ मोहिमेत चंद्रावरून आणलेल्या मातीत राबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वनस्पतीच्या बिया लावल्या होत्या. त्या सर्व उगवल्या. विशेष म्हणजे ही माती पृथ्वीवरील मातीपेक्षा वेगळी आहे. त्यानंतरही त्यात रोपे उगवल्यामुळे शास्त्रज्ञांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे. अशाप्रकारचे हे पहिलेच संशोधन नाही. जानेवारी २०१९ मध्ये असाच प्रयोग चीनने केला होता. त्यावेळी त्यांनी आकाश मोहिमेवर जाताना सोबत कापसाचे बियाणे नेले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami