नासाच्या शास्त्रज्ञाचा दावा
नवी दिल्ली – चंद्रावर घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, २०२३ पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल आणि तेथे आपले काम देखील करू शकेल.अमेरिकन स्पेस सेंटर नासाने नुकतेच मिशन मून कार्यक्रमांतर्गत आपले आर्टेमिस-१ रॉकेट प्रक्षेपित केल्यांनतर आता नासाने दावा केला आहे .
अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यासाठी अवकाश संशोधन संस्था प्रयत्न करत आहेत. तसेच पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर मानवाला राहता येईल का याबाबतही संशोधन सुरु आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी २०२३ पर्यंत मानव चंद्राच्या पृष्ठभागावर राहू शकेल असा दावा केला आहे. आर्टेमिस-1 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दिशेने सोडण्यात आलेल्या ओरियन स्पेसक्राफ्ट कार्यक्रमाचे प्रमुख हॉवर्ड हू यांनी सांगितले की, नासाने अलीकडेच आपल्या शक्तिशाली स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेटद्वारे ओरियन अंतराळयान चंद्राच्या दिशेने पाठवले आहे. ओरियन अंतराळयान सध्या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे.चंद्राला प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर सुखरुप परत येईल का हे तपासलं जात आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकलले गेले होते, त्यानंतर गेल्या आठवड्यात ते लाँच करण्यात आले. सुमारे ५० वर्षांनंतर नासा चंद्राच्या दिशेने मानवी मोहीम सुरू करत आहे. सध्या जे ओरियन अंतराळयान चंद्राभोवती फिरत आहे, त्यामध्ये मानव नाही. पण भविष्यात त्याच पण त्याच अंतराळयानातून मानवाला चंद्रावर पाठवलं जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
जर ही मोहिम यशस्वी झाली तर १९७२ नंतर पहिल्यांदा मानव चंद्रावर पाऊल ठेवेल. या अंतराळयात्रींमध्ये पुरुष आणि महिला यात्रींचा समावेश असेल. अंतराळयात्रींना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाईल. हे अंतराळयात्री चंद्रावरील पाणी आहे का शोधलं जाईल. जर चंद्रावर पाण्याचे स्रोत सापडले तर चंद्रावरून मंगळावर रॉकेट लाँच करता येईल.