नवी दिल्ली – जी मुले एकेकाळी आकाशात पाहून चंद्र-ताऱ्यांची चित्रे काढत होती. त्याच मुलांना आता भारतात रॉकेट बनवण्याची संधी मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मध्ये सांगितले. या कार्यक्रमाचा आज ९५ वा भाग होता.
मित्रांनो अंतराळ क्षेत्रातील यश भारत आपल्या शेजारी देशांसोबत वाटून घेत आहे. कालच भारताने एक उपग्रह प्रक्षेपित केला. भारत आणि भूतानने संयुक्तपणे तो विकसित केला आहे. तेलंगणातील हरीप्रसाद गुरु यांनी काही दिवसांपूर्वी हाताने विणलेला जी-२० मला पाठवला होता. ही अद्भुत भेट पाहून मला आश्चर्य वाटले. तेलंगणात बसलेल्या माणसाला जी-२० शिखर परिषदेशी किती जोडले जाते, असे मला वाटले. शांतता असो वा एकता, पर्यावरणाविषयी सवेदनशीलता असो किंवा शाश्वत विकास. या आव्हानांवर भारताकडे उपाय आहेत. आम्ही जी-२० शिखर परिषदेला दिलेली ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही थीम आमची बांधिलकी दर्शवते. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे.
काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ड्रोनद्वारे सफरचंदाची वाहतूक कशी होते, हे आपण पाहिले. गेल्या ८ वर्षांत भारतात वाद्याची निर्यात साडेतीन पटीने वाढली. इलेक्ट्रिक वाद्य यंत्राबद्दल बोलायचे तर निर्यात ६० पट वाढली. यावरून भारतीय संस्कृती आणि संगीत जगात किती लोकप्रिय आहे हे लक्षात येते. कोणी पर्यावरणासाठी प्रयत्न करत आहे. कोणी पाण्यासाठी काम करत आहे. शिक्षण, वैद्यक, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, परंपरा अशा अनेक क्षेत्रात अनेक लोक असामान्य कार्य करत आहेत. प्रत्येक नागरिकाला आपले कर्तव्य समजत आहे. नागरिकांमध्ये अशी कर्तव्याची भावना निर्माण होते तेव्हा त्याचे सोनेरी भवितव्य आपोआप ठरते. त्या देशाच्या सुवर्ण भविष्यात आपल्या सर्वांचे सोनेरी भविष्य असते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.