चंदगड – कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल भागात हत्तीचे वास्तव्य असते. हे सर्वांनाच माहीत आहे.पण हे हत्ती उपद्रवी असून त्यांचा धुमाकूळ मानवी नुकसानीला कारणीभूत ठरत आहे.त्यांना काबूत आणण्यासाठी आता या हत्तींची भाषा ओळखणारा माणूस कोल्हापुरात दाखल झाला आहे.आनंद शिंदे असे त्यांचे नाव असून ‘एलिफंट अंकल ” म्हणून त्यांना ओळखले जाते.
हे ‘हत्तींचे काका’ चंदगडला आले आहेत.चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात तब्बल दोन दशकांपासून हत्तींच्या कळपाने हैदोस घातला आहे.जंगली हत्तींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.हत्तींना पिटाळण्यासाठी शासन हतबल झाले आहे.अशा वेळी हा वेडा माणूस हत्तींची भाषा समजून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षे चंदगड तालुक्यातील हत्तीप्रवण क्षेत्रात राहणार आहे.तो चक्क हत्तींशी बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो.
अवघ्या तीन-चार वर्षांच्या संवादामध्ये त्यांना जागतिक मान्यता मिळाली आहे.हत्ती हल्ला करताना त्याची बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोली,
प्रतिसाद,संवाद साधताना प्रतिसाद देतात का? त्यांना राग का येतो? आदी हत्तीच्या वावरण्याचा अभ्यास केला जाणार आहे.
तत्कालीन वनमंत्री जावडेकर यांनी चंदगड तालुक्यातील हत्तीप्रवण क्षेत्रांची माहिती दिली होती. त्यानंतर ते २०१८ मध्ये आले होते. पुन्हा आज तिलारी भागात आले. आता मात्र येत्या काही दिवसांतच शिंदे हे सलग तीन वर्षांसाठी केरळहून वस्तीलाच येणार आहेत.‘हत्तींचे काका शिंदे’ यांच्यामुळे तरी हत्ती जातील का? असा भेडसावणारा प्रश्न येथील शेतकर्यांना पडला आहे.काही दिवसांतच शिंदेे चंदगड,आजरा भागांत येणार आहेत.येथील घुसखोरी करणार्या हत्तींचा ते दोन वर्षे अभ्यास करणार आहेत.राहिलेल्या एका वर्षात ते त्यांच्या देहबोलीचा अभ्यास करून हत्तींना आपल्या मूळ निवासी जंगलात कसे पाठवता येतील,याचे संशोधन करणार आहेत.