संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

चांदवड बाजार समितीमध्ये ३ दिवस कांदा लिलाव बंद

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नाशिक – जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीतील कांदा लिलाव आजपासून ३ दिवसांसाठी बंद असणार आहे. गेल्या २ ते ३ दिवसांपासून बाजार समितीत जुन्या आणि नव्या कांदा व्यापाऱ्यांच्या वादातून संघर्ष सुरू होता. या वादातूनच २ दिवसांपूर्वी जुन्या कांदा व्यापाऱ्यांनी अचानक लिलावातून काढता पाय घेतल्याने कांदा लिलाव काही काळ ठप्प झाला होता.

या वादातून मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे चांदवड बाजार समितीने शेतकऱ्यांना वेठीस धरल्याप्रकरणी जुन्या कांदा व्यापाऱ्यांचे परवाने ३ दिवसांसाठी निलंबित केले असून सोमवारपासून जुन्या आणि नव्या व्यापाऱ्यांच्या एकत्रित सहभागातून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चांदवड बाजार समितीतील कांदा लिलाव सोमवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. मात्र ३ दिवस कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami