मुंबई – अंटीलिया जेलेटिनप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन माध्यमांसमोर वक्तव्य करत असल्याचा अर्ज निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी चांदेवाल आयोगाकडे दाखल केला होता. या अर्जावरुन नोटीस पाठवल्यानंंतर नबाव मलिकांनी आपल्या वकीलांसह आज आयोगासमोर हजेरी लावली. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आयोगाने वाझेंचा अर्ज फेटाळून लावत त्यांना दिलासा दिला.
त्यानंतर नबाव मलिक म्हणाले की, मला चांदेवाल आयोगाने नोटीस पाठवली होती. या नोटिशीत मला हजर राहण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र तरी देखील मी आयोगासमोर हजेरी लावली. मी अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन माध्यमांसमोर वक्तव्य करत असल्याचा आरोप वाझेंनी आपल्या अर्जाद्वारे आयोगासमोर केला होता. या आरोपीवरुन मी आयोगाला सांगितले की, मी जी वक्तव्य केली आहे, जी दाखल केलेल्या एफआयआरवरुन केली आहेत. वक्तव्य आणि विधान करणे माझा अधिकार आहे. माझी बाजू ऐकल्यानंतर आयोगाने वाझेंचा अर्ज फेटाळून लावत नोटीस रद्द केली, असे नबाव मलिकांनी सांगितले.