संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

चार दिवस कामाचे,तीन दिवस आरामाचे
इंग्लंडच्या १०० कंपन्यांची नवी योजना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – इंग्लंडमध्ये जगभरात चार दिवस कामाचे आणि बाकी तीन दिवस आरामाचे… हा प्रगोग यशस्वी होत आहे. याचा फायदा कंपनी आणि कर्मचाऱ्यांना होत असून भारतात देखील नवीन कामगार कायद्याची आतुरतेने वाट पहिली जात आहे.कारण यासंदर्भातील योजनेला सरकार मंजुरी देऊ शकते.ब्रिटनमध्ये तब्बल १०० कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवस सुट्टी आणि आठवड्यातून चार दिवस कामाच्या धोरणाला मंजुरी दिली आहे.
विशेष म्हणजे याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही.आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन सुट्या या मोहिमेमुळे देशात बदल घडू शकतील, अशी कंपन्यांना आशा आहे. ब्रिटनच्या या १०० कंपन्या मिळून सुमारे २,६०० कर्मचाऱ्यांना रोजगार देतात.यामुळे कंपन्यांचे उत्पादन सुधारेल, असे आठवड्यातून चार दिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. ब्रिटनमधील १०० कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना ४ दिवस काम करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.तसेच या कर्मचार्‍यांच्या पाचव्या दिवशी वेतनात कपात होणार नाही. दरम्यान, ४ कामकाजाच्या दिवसांमुळे देशात मोठे बदल अपेक्षित असल्याचे या कंपन्यांचे मत आहे. विशेष म्हणजे येथील काही बँकाही चार दिवस कामकाजाच्या सूत्रावर काम करणार आहेत.
द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा कंपन्यांना उत्पादन सुधारण्यासाठी आणि कमी वेळेत समान प्रमाणात काम पूर्ण करण्यास प्रोत्साहित करेल, असा युक्तिवाद केला आहे. ज्या कंपन्यांनी नवीन धोरण लवकर स्वीकारले आहे, त्यांना कर्मचार्‍यांना आकर्षित करण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. ब्रिटनच्या १०० कंपन्यांपैकी दोन सर्वात मोठ्या कंपन्यांनी, अ‍ॅटम बँक आणि जागतिक विपणन कंपनी एविन, यांनी चार दिवस कामकाजाचा अवलंब करण्यासाठी मान्य केले आहे. दोन्ही कंपन्यांचे ब्रिटनमध्ये ४५० हुन अधिक कर्मचारी काम करत असून त्यांना चार दिवस काम करण्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.ब्रिटनमध्ये जून महिन्यात ६ महिन्यांच्या पायलट प्रोग्राम अंतर्गत चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्ट्यांचा फॉर्म्युला लागू करण्यात आला. यामध्ये एकूण ७० कंपन्यांनी भाग घेतला. तर हा प्रायोगिक कार्यक्रम ‘फोर डे वीक ग्लोबल’, ‘फोर डे वीक यूके कॅम्पेन’ आणि ऑटोनॉमी या विनानफा गटांनी सुरू केला होता. या प्रकल्पाचे निकाल २०२३ मध्ये जाहीर होणार आहेत. प्रायोगिक कार्यक्रमात ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठातील शैक्षणिक तसेच यूएसमधील बोस्टन कॉलेजमधील तज्ञांचा समावेश आहे.या मोहिमेत ३,३०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले,ज्यात बँकिंग, मार्केटिंग,रिटेल, फायनान्स आणि इतर अनेक क्षेत्रातील लोकांचा समावेश होता.याशिवाय ब्रिटनमधील अनेक कंपन्या चार दिवस कामाचा फॉर्म्युला अंमलात आणण्याचे काम करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami