संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

चिंचवडमधील शाळेजवळील
अगरबत्तीच्या कंपनीला आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पिंपरी – चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पंढरकर नगर येथील एका अगरबत्ती बनविणारी कंपनीला सकाळी साडेदहा च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.यावेळी कंपनीच्या शेजारीच असलेल्या बिना इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतून ४० विद्यार्थ्यांना बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

रॉयल फ्रेग्णसेस प्रा. ली अगरबत्ती बनविणारी कंपनीत अचानक आग लागली. काही क्षणात आजच्या रौद्ररूप धारण केले.घटनासस्थळी अग्निशामक दल दाखल झाले. मात्र तीन तासानंतरही ही आग आटोक्यात आली नाही. घटना घडली त्यावेळी शाळा सुरु होती. शाळेत २०० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याची माहिती निगडी पोलीसांनी दिली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच खबरदारी म्हणून घटनास्थळाच्या शेजारी असलेल्या या बिना इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मात्र कंपनीला लागलेल्या या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागलेल्या संबंधित कंपनीत आग लागली तेव्हा काही कामगार कामावर उपस्थित होते. सुदैवाने ते यामधून बचावले असून ते सुखरूप बाहेर पडले असल्याचे पोलीसांनी सांगितले. या आगीत मात्र कंपनीचे मोठं नुकसान झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami