संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

चित्रपटात वास्तव नाही, ‘गंगुबाई काठियावाडी’ला कुटुंबियांचाच विरोध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट प्रदर्शनाच्या आगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. या चित्रपटात गंगुबाई काठीयावाडी यांचे चित्रण वास्तवाला सोडून रंगवल्याचे म्हणत या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची बदनामी केल्याचा आरोप गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबियांनी केला असून, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील कुटुंबियांनी केली आहे.

लेखक एस. हुसेन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित संजय लीला भन्साली यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटात आलिया भट प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर प्रसारित झालाय. दरम्यान यामध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टींवर गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतलाय. गगुंबाई यांची मुलगी बबीता गौडा म्हणाली, ‘गंगुबाई यांना त्यांच्या प्रियकराने फसवून आणून कधीही विकले नाही. गंगुबाई यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती, त्यामुळे त्या स्वतःहून गुजरात येथील आपल्या घरातून पळून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या कामाठीपुरा परिसरात वास्तव्यास होत्या. मात्र त्यांनी स्वतःहून वेश्याव्यवसाय कधीही केला नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याविरोधात गंगुबाई यांनी संघर्ष सुरू करून त्यांना न्याय देण्यासाठी त्यावेळचा माफिया डॉन करीम लाला यांची भेट घेऊन मदत मागितली होती. मात्र आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्या पुस्तकात न लिहिता अनेक काल्पनिक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप विकास गौडा गंगुबाई यांच्या नातवाने केला आहे.

गंगुबाई काठीयावाडी यांचा उल्लेख त्या पुस्तकात गंगुबाई कोठेवाली असा चुकीचा करण्यात आल्याचं विकास यांनी सांगितलं. त्यामुळे या पुस्तकावर आधारित या चित्रपटामुळे गंगुबाई यांचे व्यक्तिमत्व बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असून त्यावर बंदी घालण्याची मागणी देखील त्यांनी केलीय. तसेच या चित्रपटावर अखिल पद्मशाली समाज ट्रस्ट मुंबई या तेलगु समाजाच्या संघटनेने देखील आक्षेप नोंदवला आहे. तसेच येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही आक्षेप नोदंवला आहे. तसेच, या चित्रपटाला स्थानिक आमदार अमीन पटेल यांनीही विरोध दर्शवला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami