संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

चित्रपट बॉयकॉट करण्यावरुन पुष्कर श्रोत्रीचे कदमांना आव्हान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई:- ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजप आमदार राम कदम यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. अभिनेता आणि निर्माता पुष्कर श्रोत्री याने तीव्र शब्दात राम कदम यांचा समाचार घेतला आहे. तसेच याबरोबरच त्यांनी राम कदम यांना एक आव्हान दिले आहे.

एका चर्चेत अभिनेता पुष्कर सोत्री आणि आमदार राम कदम सहभागी झाले होते. पुष्कर श्रोत्री यांनी यावेळी दीपिका पदुकोणचे समर्थन केले आहे. ते म्हणतात की,‌ राम कदम सर तुम्ही संत महात्मांना पाठिंबा देताय ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही हे गाणे पाहिले असेल त्यात तिने विविध रंगाचे कपडे घातलेत. या एका रंगावर माझा हक्क आहे आणि हा रंग त्यांचा आहे असे आपण म्हणू शकत नाही. जर बॉयकॉट करायचा नसेल तर तुम्ही इथे जाहीरपणे सांगा की चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा, जर तो तुम्हाला आवडला तर ते जाहीरपणे सांगा. तसेच जर नाही आवडला तर तुम्ही ते वाईट आहे तो बघायला जाऊ नका, असे देखील दुपटीने सांगा. पण तुम्ही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहा, असे जाहीरपणे का सांगत नाहीत?

पुष्कर श्रोत्री पुढे म्हणतात की, कोव्हिड नंतर प्रेक्षक हे चित्रपटगृहात येत नाही. एक निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मला याची धास्ती आहे. प्रेक्षकांची चित्रपटगृहात यावे आणि पूर्वीसारखं चित्रपटाचा आनंद घ्यावा यासाठी मी काय करायला हवे याचा विचार मी कायम करत असतो. कोणत्याही एका क्षुल्लक कारणावरुन कपड्याचा रंग हा असावा की तो असावा हा प्रश्न किती किरकोळ आहे. त्या गाण्यात दीपिका पदुकोणने अनेक रंगाचे कपडे घातले आहेत. सोनेरी, पिवळा, निळा, सप्तरंगी असे रंग घातलेत. त्यामुळे रंगावर प्रत्येक पक्षाचा किंवा धर्माचा हक्क असू शकत नाही.

त्यापेक्षा लोकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करायला हवी. राम कदम असू दे किंवा आणखी कोणी राजकीय नेतेमंडळी, पक्षातील लोकांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. पण यापुढेही करायला हवी की लोकांनी चित्रपटगृहात यायला हवं. चित्रपट हे चित्रपटगृहात बघायला हवेत, यासाठी आम्हाला मार्गदर्शन, मदत, पाठिंबा, प्रेम हे तुमच्याच कडून मिळायला हवा. कारण बॉयकॉट करणे हे चुकीचे आहे. आम्हाला त्याची फार भीती वाटते. आम्ही धास्तावलो आहेत. आमचे पैसे पणाला लागलेले असतात. निर्माते घरं गहाण टाकून चित्रपट बनवतात. या सर्वांना तुम्ही एका रंगासाठी बॉयकॉट करुन चित्रपट पाहू नका हे सांगणे चुकीचे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami