संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 04 July 2022

चित्रा रामकृष्णन यांच्यावर कारवाई होण्याआधीच एनएसईच्या शेअर्सची विक्री

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एनएसईच्या अध्यक्षा चित्रा रामकृष्णन यांच्यावर सेबीने कारवाई केली आहे. मात्र, त्याआधीच एनएसईच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. एनएसईच्या समभाग ट्रान्सफर डेटामधून ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे यात मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय सेबीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

एनएसईच्या समभागांमध्ये २०९ व्यवहार झाले आहेत. त्यातील एक तृतीयांश विदेशी भागधारकांशी जोडलेले आहेत. या परदेशी भागधारकांनी एनएसईचे समभाग इतर भागधारकांना विकले. परदेशी गुंवणूकदारांनी ११.६१ लाख समभाग १ हजार ६५० आणि २ हजार ८०० रुपयांच्या किंमतीमध्ये विकले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे याचा थेट संबंध शेअर बाजारातील कोट्यवधींच्या को-लोकेशन घोटाळ्याशी असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती एनएसईच्या संकेतस्थळावर असलेल्या डेटावरून समोर आली आहे.

हिमालयातील एका साधूच्या सांगण्यावरून चित्रा रामकृष्णन शेअर मार्केट चालवित होत्या. त्यांच्या सुचनांनुसार गुंतवणूक सुरू होती. त्यामुळे या घोटाळ्यात अद्यापही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून सरकार त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बोलण्यास नकाल दिला आहे. त्यामुळे चित्रा रामकृष्णन यांच्यावर आता नक्की काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami