संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

चीनच्या एक्स्प्रेस वेवर बस उलटून तब्बल २७जण ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चीन: आंतरराष्ट्रीय जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातील गुइझोउ प्रांतात रविवारी एका एक्स्प्रेस हायवेवर हा भीषण अपघात घडला.रविवारी झालेल्या या भीषण रस्ता अपघातात बस उलटून २७ जण ठार तर २० जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, बसमध्ये एकूण ४७ जण होते.
दोन दिवसांपूर्वीच चीनच्या शांघायमध्ये एका गगनचुंबी इमारतील आग लागली होती. या इमारतीच्या वरच्या मजल्यांना आगीने आपल्या कवेत घेतले होते. इमारतीच्या आगीचे दृश्य थरकाप उडवणारे असल्याचा व्हिडीओही समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी चीनमधील सांडू काउंटीमध्ये एक्सप्रेस वेवर बस उलटल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या प्रांतीय राजधानी गुइयांगपासून सुमारे १७० किमी आग्नेयेस असलेल्या सांडू काउंटीमध्ये रविवारी सकाळी हा अपघात झाला. या भीषण बस अपघातामध्ये तब्बल २७ जणांनी प्राण गमावले आहे. चीनमध्ये घडलेल्या या अपघाताने प्रचंड जीवितहानी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर आता स्थानिक पोलीस आणि बचाव यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाली आहे. पुढील कारवाई केली जाते आहे. जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यासाठी रुग्णवाहिकांची मदत घेण्यात येत आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक खोळंबल्याची माहिती मिळतेय.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २७ जणांचा एकाच वेळी बस अपघातात मृत्यू झाल्याने एकच हाहाकार उडाला आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला, याचाही आता तपास केला जातो आहे. २०२२ या वर्षात चीनमध्ये झालेला आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अपघात असल्याचं एएफपी या वृत्त संस्थेन म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami