संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

चीनने लढाऊ विमाने आणि जहाजे तैवानच्या सीमेजवळ पाठवली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तैपेई (तैवान)- अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला १२ दिवस झाल्यानंतर आणखी काही अमेरिकन खासदार तैवानला पोहोचले. यामुळे चीन आणखीनच चिडला आहे . तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की तैवान सामुद्रधुनी मध्य रेषा अनेक चिनी विमाने आणि जहाजांनी ओलांडली आहे.तैवान न्यूजच्या वृत्तानुसार, संरक्षण मंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या देशाच्या सीमेभोवती १७ चिनी लष्करी विमाने आणि पाच जहाजांच्या हालचालींचा मागोवा घेतला.

तैवानमधील संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) च्या या १७ विमानांपैकी १० ही चिनी विमाने होती. यापैकी चार सुखोई एसयू-३० लढाऊ विमाने, तीन शेनयांग जे-११ जेट फायटर, दोन शेनयांग जे-१६ जेट फायटर अशी विमाने आहेत. या सर्वांनी तैवानच्या सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडली. हवा आणि पाण्यात चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तैवाननेही आपल्या देशाच्या सीमेभोवती लढाऊ विमाने आणि जहाजांनी गस्ती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा चीन आणि तैवान मध्ये तणाव पुन्हा वाढला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami