संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

चीनमधील माजी मंत्र्यांसह दोन अधिकाऱ्यांना मृत्यूदंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग-चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेंतर्गत माजी मंत्र्यांसह दोन चिनी अधिकाऱ्यांना दोन वर्षांच्या शिक्षेसह मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. माजी न्यायमंत्री आणि चीनचे सर्वात शक्तिशाली पोलीस प्रमुखांपैकी एक असलेल्या फू झेंगहुआ यांना गुरुवारी उत्तर-पूर्व चीनच्या जिलिन प्रांतात इंटरमिडिएट पीपुल्स कोर्ट ऑफ चांगचुनने १७.३ मिलियन अमेरिकी डॉलरच्या भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

फू झेंगहुआ यांना शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांतच याच कोर्टाने जिआंगसूचे माजी अधिकारी वांग लाइक यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. अधिकृत माध्यमांच्या माहितीनुसार,त्यांना लाच स्वीकारणे,गुन्हेगारी गटांशी संगनमत आणि बनावट ओळखपत्र तयार करणे याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

चिनी मीडियाच्या एका रिपोर्टनुसार,वांग जिआंगसू प्रांतीय समिती कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे माजी सदस्य आणि सीपीसी जिआंगसू प्रांतीय समितीच्या राजकीय आणि विधी समितीचे माजी सचिव आहेत.तत्पूर्वी, बुधवारीच भ्रष्टाचार प्रकरणात तीन पूर्व भागातील पोलीस प्रमुखांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.त्यांच्यावर हाँगकाँगस्थित साउथ चायना मॉर्निंगच्या माजी सार्वजनिक सुरक्षा उप मंत्री सन लिजुनच्या नेतृत्वाखालील राजकीय गटाचा भाग असल्याचा आरोप होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami