चीन-चीनमधील फॉक्सकॉन अॅपल प्रकल्पातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर 20 हजारहून अधिक कर्मचार्यांनी काम सोडले आहे. त्यापैकी बहुतेक कर्मचारी नव्याने कामावर रुजु झाले होते. या सर्व कर्मचार्यांनी अॅपल पुरवठादार फॉक्सकॉनचा चीनमधील झेंगझोऊ प्रकल्प सोडला आहे.
जगातील सर्वात मोठ्या आयपोन कंपनीतील कामगारांच्या अशांततेमुळे कंपनीचे नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्ण उत्पादन पुन्हा सरु करण्याचे लक्ष्य साधता येणार नाही. फॉक्सकॉनच्या अॅपल प्रकल्पातून मोठ्या संख्येने कर्मचारी बाहेर पडले तरी सध्याच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच व्यवस्थापनाने नवीन कर्मचार्यांना काम करण्यापूर्वी ऑनलाईन प्रशिक्षण घेणे आवश्यक केले आहे. फॉक्सकॉनने ऑक्टोबरमध्ये कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्यानंतर बोनस आणि उच्च पगाराचे कामगारांना आश्वासन देत या महिन्याच्या सुरुवातीला हायरिंग ड्राईव्ह सुरु केला. प्रतिबंधामुळे कंपनीला बर्याच कर्मचार्यांना वेगळे करण्यास भाग पाडले आणि प्लांटच्या परिस्थितीमुळे अनेकांना काम सोडण्यास प्रवृत्त केले.