संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

चीनमध्ये भूकंपाचे दोन तीव्र धक्के रिश्टर स्केलवर ६.८ तीव्रतेची नोंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग : चीनच्या नैऋत्य भागात आज एकामागोमाग एक असे दोन जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र भूकंपामुळे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त नसल्याची माहिती समोर आली आहे.
चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चीनच्या सिचुआन प्रांताच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू लुडिंग शहरात १६ किमी खोलीवर होता. केंद्राने सांगितले की, सिचुआनची राजधानी चेंगडूच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे १८० किमी पर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि चांगशा आणि शियान सारख्या दूरच्या भागात राहणाऱ्या लोकांनीही भूकंपाच जोरदार हादरे जाणवले आणि हादरे बसल्यानंतर ते त्यांच्या घरातून बाहेर आले. अहवालानुसार, पहिल्या भूकंपानंतर काही मिनिटांनी लुडिंगजवळील यान शहराला ४.२ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप बसला. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. याआधी २०१३ मध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते, ज्यामध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोक जखमी झाले होते, असे चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने सांगितले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami