संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

चीनमध्ये ४९ वाहनांची धडक!
१६ जणांचा मृत्यू, ६६ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग – मध्य चीनच्या हुनान प्रांतात मोठा विचित्र अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.अवघ्या १० मिनिटांत तब्बल ४९ वाहनांची धडक होऊन १६ जण ठार तर ६६ जण जखमी झाले.काल रविवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली.
चांगशा शहरातील शुचांग-ग्वांगझू महामार्गावर हा अपघात झाला. सरकारी न्यूज पोर्टल सीजीटीएनने याबाबत वृत्त दिले असून,१० मिनिटांत एकूण ४९ वाहने धडकली असल्याचे बातमीत म्हटले आहे.दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात अनेक वाहने एकमेकांना धडकून मोठा अपघात झाल्याचे दिसत आहे. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, अपघाताच्या ठिकाणी मोठी आग देखील लागल्याचे दिसत आहे. घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिस देखील दाखल झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यासंदर्भातील बातमीत स्थानिक वाहतूक पोलिस विभागाचा हवाला देत अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला असून ६६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यात म्हटले आहे. अपघातामुळे यामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाल्याने प्रशासनाच्या वतीने वाहन चालकांना सतर्क करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या