संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

चीनेचे माजी राष्ट्रपती ‘हू जिंताओ’ यांना पक्षाच्या बैठकीतून जबरदस्ती बाहेर काढले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग- चीनमध्ये राजकीय उलथापालथ होत असल्याचे चित्र दिसत आहे. चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या समारोप समारंभातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले आहे. तेथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चीनच्या अध्यक्षांच्या डावीकडे बसलेल्या 79 वर्षीय माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना बाहेर काढण्यात आले. याचबरोबर चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो यांच्यासह स्थायी समितीच्या इतर तीन सदस्यांची आज नवनिर्वाचित केंद्रीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली.

चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची आठवडाभर बैठक चालली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा होत आहे. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर या बैठकीपूर्वी कम्युनिस्ट पक्षाने आगामी पाच वर्षांचा देशाचा अजेंडा निश्चित केला आहे. आठवड्याभरापूर्वी उद्घाटन सत्रात शी जिनपिंग यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठी सध्याच्या मार्गावर राहण्याचा त्यांचा निर्धार दर्शविला आहे.पक्षाच्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 200 सदस्यीय मंडळाच्या नवनिर्वाचित केंद्रीय समितीच्या पहिल्या बैठकीनंतर, शी जिनपिंग यांची रविवारी सरचिटणीसपदी निवड होण्याची अपेक्षा आहे. यामुळे मार्चमध्ये सरकारच्या वार्षिक विधिमंडळ अधिवेशनादरम्यान जिनपिंग यांना चीनचे अध्यक्ष म्हणून तिसरी टर्म मिळण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami