नवी दिल्ली- आधुनिकीकरणाच्या नादात जुन्या परंपरेच्या वस्तू आता कोणी वापरत नाही. मात्र, त्याच वस्तू चढत्या भावाने ऑनलाइन बाजारात मिळत आहेत. चुलीतून मोफत मिळणारी राख ऑनलाइन कंपन्या आता महागड्या दराने विकू लागल्या आहेत. ही राख १८०० रुपये दराने ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर विकली जाते.
निसर्गातून आलेल्या या गोष्टी पूर्वी मोफत मिळत होत्या. पण, आता त्यासाठी पैसे मोजावे लागतात. दात घासायचे दातून १०० ते १५० रुपये, आंब्याची लाकडे २९९ रुपये, जुन्या काळातील खाट ८५०० रुपये आहे. तर ‘ॲश पावडर’ या नावाने ओळखली जाणारी चुलीतली राख १८०० रुपये प्रति किलो भावाने विकली जाते. तसेच गायीच्या शेणाच्या गोवऱ्या ४५० रुपयांना मिळते.