मुंबई- चेंबूरमधील भूखंडाचे मनोरंजन व मैदानासाठी असलेले आरक्षण बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे तेथे आता क्लब आणि जिमखाना होणार आहे. सरकारच्या नियोजन व नगररचना विभागाच्या प्रस्तावानंतर मुंबई महापालिकेने मैदानाच्या जागी क्लब आणि जिमखाना बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लेखी सूचना आणि हरकती पालिकेने मागवल्या आहेत. त्या एक महिन्यात पाठवायच्या आहेत. त्यानंतर सरकारची मंजुरी मिळाल्यावर क्लब आणि जिमखाना बांधकामाला सुरुवात होणार आहे.
चेंबूरमधील भूमापन क्रमांक ४११ ‘ब’ हा भूखंड मनोरंजन व मैदानासाठी आरक्षित आहे. मात्र राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार मुंबई पालिकेने त्याचे आरक्षण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मैदानाच्या जागी क्लब आणि जिमखाना होणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. त्यांनी एक महिन्याच्या आत त्या लेखी पाठवायच्या आहेत. त्यानंतर सरकारची मंजुरी घेऊन क्लब आणि जिमखाना बांधकामासाठी निविदा मागवल्या जातील, अशी माहिती महापालिकेच्या विकास व नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता सुनील राठोड यांनी दिली. पालिकेच्या २०३४ विकास नियोजन आराखड्यानुसार या मैदानाचे आरक्षण बदलले आहे. तेथे क्लब आणि जिमखान्याचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. एक महिन्याच्या मुदतीत पालिकेला मिळालेल्या सूचना आणि हरकतींची दखल घेतली जाईल. त्यानंतर आलेल्या सूचना, हरकतींची दखल घेतली जाणार नाही, असेही पालिकेच्या विकास, नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे.