चेक बाऊन्स प्रकरणातील आरोपीची शिक्षा आणि दंड न्यायालयाकडून रद्द

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

श्रीनगर – १० लाखांच्या चेक बाऊन्स प्रकरणी जम्मू काश्मीर महील कनिष्ठ न्यायालयाने एका आरोपीला सुनावलेली २ लाखांचा दंड आणि सहा महिन्याची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच हा खटला पुन्हा कनिष्ट न्यायालयाकडे सुनावणीसाठी पाठवला आहे.

चेक बाउन्सचा गुन्हा कलम १३८ अंतर्गत येतो आणि यापूर्वी देशभरात अशा प्रकारचे अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पण आरोपीची शिक्षा माफ करण्याचा प्रकार कुठल्याही राज्यातील उच्च न्यायालयात घडला नव्हता. पण जम्मू काश्मीर मध्ये मात्र असा प्रकार घडला. १० लाखांच्या चेक बाऊन्स प्रकरणी एका आरोपीला २४ जानेवारी २०२० मध्ये कनिष्ट न्यायालयाने दोषी ठरवून २ लाख रुपये दंड आणि ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणी त्या आरोपीने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाल जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या खटल्याची सुनावणी न्या. संजीवकुमार यांच्या खंडपीठासमोर सुरु होती. या प्रकरणी आरोपीच्या वतीने त्याच्या आर्थिक स्थितीची माहिती न्यायालयात देण्यात आली. आणि कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने त्या आरोपीची दंडाची आणि सहा महिन्याची शिक्षा रद्द केली. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, एन आय अधिनियम १३८ अन्वये जरी एखादा आरोपी दोषी ठरत असला तरी त्याच नियमाच्या आधारे, आरोपीच्या प्र्तीपुरक स्थितीचाही विचार होणे आवश्यक आहे. चेकची रक्कम आणि चेकच्या देयकाची तारीख याचे उचित व्याजासह परतफेड व्यवहार्य असली तरी न्यायालयाने एन आय कायद्याच्या कलम १४३ ए अन्वये देण्यात आलेली नुकसान भरपाईची अंतरिम रक्कम काही असेल तर त्याबाबत आरोपीच्या आर्थिक स्थितीचाही विचार व्हायला हवा. या बाबत साधारण कारावासाच्या सजेस आरोपी पत्रही ठरू शकतो. अर्थात हे ट्रायल कोर्टाच्या सद्विविवेक बुद्धीवर अवलंबून आहे . त्यामुळे अशा प्रकरणात आरोपीचे आचरण आणि आर्थिक स्थिती पाहून कमीत कमी शिक्षा सुनावली जावी असे सांगून उच्च न्यायालयाने कानिस्थ न्यायालयाचा तो निकाल रद्दबातल ठरवला आणि आरोपीची शिक्षेतून मुक्तता केली मात्र हा खटला आता पुन्हा कनिष्ट न्यायालयाकडे वर्ग करण्यात आल्याने तिथे पुन्हा सुनावणी होणार आहे.

Close Bitnami banner
Bitnami