मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी परिसरात देशभरातून अनुयायी मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे तर काही अनुयायी चैत्यभूमी परिसरात आले आहे. गेल्या तीन वर्षात कोरोना असल्यामुळे देशभरातील अनुयायांना चैत्यभूमीवर येता आले नाही.
यंदा मात्र मोठ्या प्रमाणात दोन दिवस आधीच मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने देखील भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये भला मोठा मंडप घालण्यात आला असून येणाऱ्या सर्वांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा आढावा घेतला आहे