गेल्या काही वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. भाज्या, फळे, तेल, डाळी यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. असे असतानाच आता चॉकलेट, मॅगी, कॉफी यांच्या किंमतीही वाढणार आहेत. चॉकलेट, मॅगी, कॉफी निर्मिती करणाऱ्या एका कंपनीने उत्पादनाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नेस्लेने या कंपनीने उत्पादनाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणतात की,’ अन्न आणि वस्तूंची वाढती महागाई ही चिंतेची बाब आहे. ज्यामुळे कंपनीला आता त्याची किंमत कमी करण्यासाठी ग्राहकांवर काही प्रमाणात बोझा टाकायचा आहे. त्यामुळे आता भाव वाढवणे गरजेचे झाले आहे.’
उत्पादनाच्या खर्च वाढत असल्याने ते ३.१ टक्क्यांनी किंमती वाढवण्याची शक्यता आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये इनपुट कॉस्ट आणखी वाढणार आहे त्यामुळे अशा स्थितीत त्यांच्याकडे दरवाढ करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कच्चा माल, ऊर्जा आणि कामगारांच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादनांच्या किंमती वाढण्याचा इशारा कंझ्युमर गुड्स कंपन्यांनी याआधीच दिला आहे.’
नेस्लेच्या एकूण विक्रीत गेल्या वर्षी 3.3 टक्के वाढ झाली होती. या कालावधीत निव्वळ नफ्यात 38.2 टक्क्यांनी वाढ झाली. महामारीच्या काळात कॉफी, घरगुती उत्पादने आणि हेल्दी फूड प्रोडक्ट्सच्या विक्रीत वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.