संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

छत्तीसगडमध्ये ट्रकच्या धडकेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कांकेर- छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील कोरेरजवळ झालेल्या अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ऑटोचालक 8 विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, ऑटोचा चक्काचूर झाला.

मृत विद्यार्थी 5 ते 8 वयोगटातील होती. 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर कोरेर रुग्णालयात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. चालक आणि एका विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करून कांकेर येथील कोरेर चिल्हाटी चौकात ऑटो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 7 शाळकरी मुलांचा आकस्मिक मृत्यू झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ही बातमी अत्यंत दु:खद आहे. आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

आजचे हवामान
ताज्या बातम्या