बिजापूर – छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकजवळच्या जंगलात नक्षलवादी आणि सीआरपीएफचे जवान यांच्यात आज सकाळी जोरदार चकमक झाली. त्यात एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक कमलोचन कश्यप यांनी दिली.
बिजापूरच्या उसूर ब्लॉकमध्ये सीआरपीएफच्या १६८ व्या बटालियनचे जवान गस्त घालत होते. त्यावेळी तिम्मापूर जवळच्या पुतकेल जंगलात दडून बसलेले नक्षलवादी आणि सीआरपीएफचे जवान यांच्यात चकमक झाली. त्यात एक जवान शहीद झाला. तो झारखंडचा रहिवासी आहे. दुसरा जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर या जंगलात नक्षलवाद्यांविरुद्ध शोध मोहीम आणखी तीव्र केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.