कॅलिफोर्निया:- अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून चोरीला गेला आहे. सॅन होजे येथील पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सव्र्हिसेस विभागाने या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.
या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून चोरून नेला आहे. पार्क रिक्रिएशन आणि नेबरहूड सर्व्हिसेसने ट्विट करत म्हटले की, ‘ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आहे. याबाबत माहिती सांगताना आम्हाला वाईट वाटत असल्याचे त्यांनी म्हणाले आहेत. मात्र, हा पुतळा कधी चोरीला गेला? याबद्दल अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.आम्ही चोरीला गेलेल्या पुतळ्याचा शोध घेत असून शक्य तितक्या लवकर पुतळा शोधू अशी माहिती पार्क प्रशासनाने दिली आहे. या घटनेची चौकशी सुरू असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा महाराष्ट्रसह अमेरिकेतील शिवप्रेमी जनतेने संताप व्यक्त केला आहे.
अमेरिका आणि भारतामध्ये राबवण्यात येत असलेल्या सिस्टर सिटी मोहिमेमधून सॅन होजे आणि पुण्यामध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सॅन होजे शहराला भेट देण्यात आला होता. हा पुतळा शहरातील एका उद्यानात ठेवण्यात आला होता.