संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – जागतिक श्रीमंतांच्या यादीत भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांनी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांच्या संपत्तीत ५ अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याने ती १५५.७ अब्ज डॉलर्स झाली. त्यामुळे त्यांनी फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नोल्ट यांना मागे टाकले. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क त्यांच्यापुढे आहेत. पहिल्या क्रमांकावर असलेल्या मस्क यांची संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर्स आहे.

भारतीय शेअर बाजारात अदानी समूहाच्या सातही कंपन्यांचे समभाग वधारले. या समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राईजेसच्या समभागात ४.९७ टक्क्यांची वाढ झाली. अदानी ट्रान्समिशनमध्ये ३.२७ टक्के, अदानी टोटल गॅस १.१४ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी २ टक्के, अदानी पोर्टस् २.२१ टक्के, अदानी पॉवर ३.४५ टक्के आणि अदानी विल्मर ३.०३ टक्के अशी वाढ झाल्यामुळे अदानी यांच्या संपत्तीत ५ अब्ज डॉलर्सची भर पडली. त्यामुळे १५५.७ अब्ज डॉलर्स संपत्तीसह त्यांनी दुसरे स्थान पटकावले. तिसऱ्या स्थानावर फ्रेंचचे बर्नार्ड अर्नोल्ड आहेत. त्यांची संपत्ती १५५.२ अब्ज डॉलर्स आहे. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती १४९.७७ अब्ज डॉलर्स आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत अशी कामगिरी करणारे अदानी आशियातील पहिले उद्योगपती आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami