सुंदरबन- जगातील सर्वात वृद्ध वाघाचा मृत्यू झाला आहे. राजा नावाच्या या वाघाला पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते. या वाघाचे वय 26 वर्षे, 10 महिने आणि 18 दिवस होते. 23 ऑगस्टला राजाचा 27 वा वाढदिवस साजरा होणार होता आणि वन विभागाने राजाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याची जय्यत तयारीही सुरू केली होती. मात्र आज त्याचा मृत्यू झाला. 2006 पासून राजा वाघाला सुंदरबन येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते. वनविभागाकडून सांगण्यात आले की, सुंदरबनमधील माताळा नदी ओलांडत असताना मगरीने हल्ला केला. त्यामुळे राजाच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली होती.