संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

जनआंदोलन आणि निषेधामुळे
चीनमधील कोरोना निर्बंध शिथिल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग – देशातील जनआंदोलन आणि व्यापक निषेधानंतर चीनने काल बुधवारी कोरोना निर्बंध शिथिल केले.तसेच चीन सरकारने लागू केलेले शून्य कोविड धोरण रद्द करण्याच्या दिशेनेही सरकारने पावले उचलली आहेत.
शून्य कोविड धोरणामुळे देशातील अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर विपरित परिणाम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याने सरकारने ‘शून्य कोविड धोरण’ लागू केले. या धोरणामुळे टाळेबंदी आणि विविध निर्बंध लादण्यात आल्याने जनतेने संताप व्यक्त केला.चिन सरकारच्या या धोरणामुळे बीजिंग, शांघायसह अनेक प्रमुख शहरांमधील लाखो नागरिकांना त्यांच्या सदनिका किंवा घरात बंदिस्त राहावे लागते. त्याशिवाय अनेकांना रोजगारासाठी घराबाहेर पडण्यासही बंदी असल्याने या दडपशाहीला जनतेने तीव्र विरोध केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या