मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आदेश कायम ठेवत महाविकास आघाडी सरकारला 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधला आणि मुख्यमंत्रिपदाचा त्याग करत असल्याचं जाहीर केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यातील मंत्रिमंडळ बरखास्त झाले. मात्र राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले असताना, सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही ट्विटरवर उद्धव ठाकरेंचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आणि अखेर आपल्याच लोकांनी दगा दिला असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. मात्र सोशल मीडियावर अनेकांनी मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या अडीच वर्षातील कार्याचा सन्मान केला आहे. अनेकांकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असताना, बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज जे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात त्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.