न्यूयॉर्क : चंद्रावर वास्तव्य करण्याचे मानवाचे स्पप्न या दशकात पूर्ण होणार आहे. याबाबत ‘स्पेस एक्स’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी सांगितले आहे.स्पेसएक्सने चंद्रावर जाणाऱ्या त्यांच्या पहिल्या प्रवाशाची घोषणा 2018मध्येच केली होती. जपानी उद्योजक युसाकू मायेजावा 2023 मध्ये चंद्रावर जाणार आहेत. युसाकू हे जपानच्या ऑनलाईन फॅशन रिटेल वेबसाइट झोझोटाउनचे संस्थापक आहेत. त्यांनी चंद्र मोहिमेसाठी तिकीट खरेदी केले आहे.
‘डिअर मून’ असे या प्रोजेक्टचे नाव असणार असून युसाकू त्यांच्यासोबत घेऊन जाणाऱ्या कलाकार सदस्यांची निवड प्रक्रिया करण्यात आली आहे. चंद्र मोहिम ही जवळपास 5 ते 6 दिवस चालणार आहे. याबाबत युसाकू यांनी स्पेसएक्सच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात सांगितले होते की, मी चंद्रावर जाण्याचे निवडले आहे. स्वतः सोबत आणखी 8 लोकांना घेऊन जाणार आहेत. यामध्ये जगभरातील कलाकार जसे की संगीतकार, चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक, फॅशन डिझायनर इत्यादींचा समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.दरम्यान,या प्रोजेक्टसाठी स्पेसएक्सच्याबिग फॅल्कॉन रॉकेट (बीएफआर ) चा वापर केला जाणार असून काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेल्या बीएफआर मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. बीएफआर हे स्पेसएक्सचे सर्वात मोठे व जास्त क्षमता असणारे रॉकेट आहे. जे 118 मीटर उंच असून, यामधून 100टन पेलोड, लोअर अर्थ ऑरबीट (एलईओ) पर्यंत वाहण्याची त्याचबरोबर पुन्हा वापर करता येण्याची याची क्षमता आहे.
विमानातून प्रवास करण्याएवढी ही मोहीम सोपी नसून यामध्ये अनेक धोके उद्भवतील त्याचबरोबर 2023 मध्येच खात्रीशीर ही मोहीम पार पडेल ,असे इलॉन मस्क यांनी सांगितले.हॅशटॅग डिअर मून प्रोजेक्ट म्हणून ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा उघडण्यात आले आहेत.