जबलपूर- मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनची वार्षिक बैठक सुरू असताना डॉक्टरांमध्ये अक्षरशः राडा झाला.या बैठकीत मोठ-मोठे डॉक्टर आले होते.पण,या बैठकीचे रुपांतर आखाड्यात झाले आणि डॉक्टरांनी एकमेकांना अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी तुडवले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक सभेत गाव गुंडांप्रमाणे सुक्षित डॉक्टर एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत होते. या संपूर्ण मारहाणीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाषण सुरू असतानाच डॉक्टरांमध्ये वाद पेटला आणि वादाचे रुपांतर हाणामारी झाले.यावेळी काही डॉक्टरांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला. या कार्यक्रमाची सुरुवात आयएमएचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमरेंद्र पांडे यांनी केली. यावेळी त्यांनी भोपाळ, उज्जैन,इंदूर आणि ग्वाल्हेरच्या आयएमए सदस्यांवर टीका केली. या टीकेचा ग्वाल्हेर आयएमए सदस्यांनी विरोध केला. यावेळी डॉक्टर पांडेने मंचावरुन ग्वाल्हेरच्या सदस्यांना बाहेर काढण्याची मागणी केली.
यामुळे वाद आणखी चिघळला आणि त्यांनी पांडेंना मंचावरुन धक्का दिला.यावेळी काही डॉक्टरांनी त्यांना मारहाण केली.डॉक्टरांच्या मध्यस्थीने वाद मिटलाहाणामारी वाढत असल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित अधिकारी व इतर डॉक्टरांना मदतीला यावे लागले.बराच वेळ हा वाद सुरू होता.त्यानंतर डॉ.अमरेंद्र पांडे यांनी माफी मागितल्यानंतरच संपूर्ण वाद मिटला.आयएमएचे सदस्य राकेश पाठक यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केला असून, प्रकरणाची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.