संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

जमीनदोस्त घरांनाही हजारो रुपयांची वीज बिल; महावितरण कंपनीचा धक्कादायक कारभार

Light electricity
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

भंडारा – घर जमीनदोस्त असतानाही चक्क हजारो रुपयांचे बिल आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजेचा वापर केला जात नसतानाही महावितरण हजारो रुपयांची बिलं पाठवतं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महावितरणाच्या कारभारामुळे येथील नागरिक प्रचंड हैराण आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात भंडाऱ्यातील पिपरी गाव बुडालं होतं. गोसेखुर्द धरणामुळं पुनर्वसित झालेलं हे गाव. घरातले विजेचे इलेक्ट्रिक मीटर देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले. घरं जमीनदोस्त झाली आहेत. मात्र महावितरण वीज कंपनी या वापरात नसलेल्या घरांची वीजबिलं दर महिन्याला न चुकता पाठवत आहे. पूरग्रस्त गावकऱ्यांनी नवीन ठिकाणी तात्पुरती घरं बांधलीत. तिथं इलेक्ट्रिक मीटर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण थकीत वीजबिलं आधी भरा, मग नवीन मीटर देऊ, असे महावितरणने गावकऱ्यांना सांगितलं आहे. विजेचा वापर न करताच, ३० हजार रुपयांची बिलं आली. ती कशी भरायची, अशी चिंता आता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पूरग्रस्त गावकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांना चुकीची वीजबिलं पाठवून वसुलीचा कारभार महावितरणनं सुरू केला आहे. ऊर्जामंत्र्यांनी यात लक्ष घालून, अशा उलट्या काळजाच्या महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी गावकरी व्यक्त करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami