जम्मूत अतिरेक्यांशी संबंधित ११ सरकारी कर्मचारी बडतर्फ

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

श्रीनगर – अतिरेकी संघटनांशी संबंधित असलेल्या जम्मू-काश्मीरच्या ११ सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवारी बडतर्फ करण्यात आले. त्यातील २ जण हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक सईद सलाउद्दीन याची मुले आहेत. या सर्वांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांची चौकशी करत असलेल्या समितीने केलेल्या चौकशीत काही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दहशतवादी संघटनांबरोबर लागेबांधे असल्याचे आढळले होते. त्यानुसार या समितीने ११ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची शिफारस जम्मू-काश्मीर प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार शनिवारी १० तारखेला या ११ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. यातील ३ अधिकारी लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होते. ते अतिरेक्यांना सुरक्षा दलाविषयी माहिती देत होते. याशिवाय अतिरेक्यांना आश्रयही देत होते. कारवाई झालेल्या या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अनंतनाग येथील २ शिक्षकांचाही समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami